श्री दत्ताची आरती
श्री दत्ताची आरती
आताच डाउनलोड करा भगवंत श्री दत्तात्रेय ह्याची मनोभावे लिहिलेली आरती
भगवान श्री दत्तात्रेय भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी एक आहेत. श्री दत्ताची आरती रोज सकाळी आंघॊळ केल्यावर वाचावी. ह्या ऍप्प च्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना भगवंत श्री दत्तात्रेय ह्यांची आरती शिकवू शकता. श्री दत्ताची आरती वाचल्याने लहान मुलांवर चांगले संस्कार होतात.
मुख्य वैशिट्ये :-
* श्री दत्ताची आरती वाचण्याकरिता प्ले स्टोर मधील सर्वात सोपे ऍप्प
* भगवंत श्री दत्तात्रेय ह्याची मनोभावे लिहिलेली आरती
* इंटरनेट/डेटा नसले तरी चालणारे.
* आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडविणारे ऍप्प
भगवान श्री दत्तात्रेय भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी एक आहेत.
श्री दत्ताची आरती
रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥