श्री शंकराची आरती


श्री शंकराची आरती

आताच डाउनलोड करा श्री शंकराची आरती
Google Play वर ते मिळवा
श्री शंकराची आरती रोज सकाळी आंघॊळ केल्यावर वाचावी. ह्या ऍप्प च्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना श्री शंकराची आरती शिकवू शकता. श्री शंकराची आरती वाचल्याने लहान मुलांवर चांगले संस्कार होतात. 

मुख्य वैशिट्ये :- 

* श्री शंकराची आरती वाचण्याकरिता प्ले स्टोर मधील सर्वात सोपे ऍप्प 
* देवाधिदेव महादेव शंकर ह्यांची आरती 
* इंटरनेट/डेटा नसले तरी चालणारे. 
* आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडविणारे ऍप्प

श्री शंकराची आरती


लवथवती विक्राळा ब्रह्मांडी
माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥

जय देव जय देव जय
श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

कर्पूरगौरा भोळा
नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण
शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥

देवीं
दैत्यीं सागरमंथन पैअं केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव०
॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन
मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुलतिलक रामदासा
अंतरीं ॥ जय देव० ॥ ४ ॥